Breaking News

ए. . एच. वाडिया सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.अनुराग पांगरीकर यांचे व्याख्यान संपन्न



बीड : 
शहरातील नामांकित अशा ए.एच.वाडिया सार्वजनिक वाचनालयाचा 57 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . वर्धापन दिनानिमित्त वाचनालयात विद्यूत रोषणाई , बलुन लावण्यात आले होते . यानिमित्त वाचनालयात दि . 23-1-2021 रोजी सायं . 5.00 वा . डॉ . अनुराग पांगरीकर यांचे  “वाचाल तर वाचाल ” याविषयावर व्याख्यान झाले.
यावेळी डॉ . अनुराग पांगरीकर यांनी आपल्या व्याख्यानात अनेक संदर्भ देत वाचनाचे महत्व पटवून दिले . डॉ . पांगरीकर हे बीड जिल्हा आयएमए संघटनेचे अध्यक्ष असल्या कारणाने त्यांना बीड जिल्हयात सर्वात अगोदर कोवीड -19 ची  लस घेतल्याचा बहुमान त्याना मिळाला.

त्यांनी यावेळी त्याचे महत्व सांगून प्रत्येकाने लस घ्यावी असा आग्रह केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस , ज्येष्ठ संपादक श्री . नामदेवराव क्षीरसागर , विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अमोलकचंदजी सुराणा , कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री.दीपक कर्नावट , सरचिटणीस प्रदीप मुळे यांची उपस्थिती होती . प्रमुख वक्ते डॉ . अनुराग पांगरीकर यांचा परिचय प्रा.दिलीप गांधी यांनी सभागृहास करुन दिला . तसेच वर्धापन दिनांच्या निमित्ताने वाचनालयाच्या सर्व कर्मचार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालिका सौ.अनुराधाताई खरवडकर यांनी केले . शेवटी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप श्री.नामदेवराव क्षीरसागर यांनी केला . इतर वाचनाबरोबरच सध्याची गरज ओळखून संस्थेने ई - लायब्ररी करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले . वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे सह सचिव अर्थ अ‍ॅड. अजिंक्य पांडव यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता झाली . या कार्यक्रमास कोषाध्यक्ष- सौ.सुचिता औटी , निलीमाताई पाटंगणकर , डॉ.विद्यासागर पाटंगणकर , श्री . विश्वंभरराव थिगळे , अ‍ॅड.गोविंद कासट , अ‍ॅड.ओमप्रकाश जाजू , श्री.जयप्रकाश कैवाडे , अ‍ॅड.भास्करराव सिरसाळकर , गोपाल मालु , राजीव जोशी , यासह वाचनालयाचे वाचक , सभासद , कर्मचारी वृंद उपस्थित होते. 






No comments