Breaking News

आशोक कानाडे यांच्या वाढदिवसानिमित्त चर्मकार बांधवाना व्यासायासाठी लागणारे साहित्याचे वाटप


माजलगाव येथील चर्मकार संघटनेचा सामाजिक उपक्रम

माजलगाव :  चर्मकार उठाव संघटनेचे संस्थापक आध्यक्ष आशोक नाना कानाडे यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव येथील चर्मकार संघटनेच्या वतिने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात योतो,तर यावर्षी माजलगाव शहरातील कोरानच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या चर्मकार गटई कामगार बांधवांना संघटनेच्या वतिने व्यावसायासाठी अत्यावश्यक आसणारे साहित्य वाटप करण्यात आले, यामध्ये पाँलीश ब्रस,पाँलीश डबी,दोरा व इतर साहित्यांचा समावेश आहे.

यावेळी चर्मकार उठाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे, माजलगाव तालुका अध्यक्ष बालासाहेब माने, शहरध्यक्ष ब्रम्हदेव वाघमारे, नवनाथ जाधव, बाबासाहेब सवणे, विशाल जाधव, चंदरलालबनगे व विशाल उबंरे यांची उपस्थिती होती.

No comments