Breaking News

पोलीस व आंदोलनकर्त्यात झटापट

खेटराची माळ घालण्यास गेलेल्या भाई थावरेसह कार्यकर्त्यांना अटक

माजलगाव :  गेटकेनच्या ऊस प्रश्‍नी साखर आयुक्तालय ठोस भूमिका घेत नसल्याने काल प्रजासत्ताक दिना निमित्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कार्यालयाला खेटराची माळ घालण्यात येणार होती. यावेळी आंदोनलकर्त्यांना पोलीसांनी अडवले. यात आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच झटापट झाली. गंगाभीषण थावरे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांना औरंगाबाद पोलीसांनी अटक केली. झटापटीमध्ये थावरे हे किरकोळ जखमी झाले.

साखर प्रादेशिक संचालक कार्यालयाकडून बैठकीत ठरलेल्या मुद्याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. केंद्र सरकारने जाचक कृषी कायदे आणले असून हे कायदे रद्द करण्यात यावे या दोन प्रमुख मागण्यासाठी दि २६ जाने मंगळवार रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त गंगाभीषण थावरे हे औरंगाबादच्या साखर प्रादेशिक कार्यालयात खेटराची माळ घालण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पोलीसांनी गराडा घातला. पोलीस व आंदोलनकर्त्यात झटापट झाली यात थावरे हे किरकोळ जखमी झाले. पोलीसांनी थावरे यांच्यासह शेतकर्‍यांना अटक केली.दरम्यान पोलीसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. ही दडपशाही लोकशाहीच्या विरोधात असल्याचे थावरे यांनी म्हटले आहे.


No comments