Breaking News

केज उपजिल्हा रूग्णालयात कोव्हिड लसीकरणाच्या शुभारंभ

केज । गौतम बचुटे 

येथील उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड लसीकरणाचा शुभारंभ झाला. त्याचे उदघाटन शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांच्या हस्ते आणि जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली  झाले. 

या बाबतची माहिती अशी की, दि. २५ जानेवारी सोमवार पासून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारी यांना कोव्हिड लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचे उद्घघाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांच्या हस्ते आणि भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या वेळी नगराध्यक्ष आदित्य पाटील, सभापती परीमळाताई घुले, पशुपतीनाथ दांगट, बाळासाहेब ठोंबरे, प्रा. हनुमंत भोसले, विष्णू घुले, प्रविणकुमार शेप, महादेव सूर्यवंशी, पत्रकार विजयराज आरकडे, गौतम बचुटे, अमर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, डॉ. करपे, डॉ. नेहरकर, डॉ. चाटे, डॉ. चाळक, डॉ. खळगे, डॉ. सोळुंके, डॉ. वासुदेव नेहरकर, डॉ. मुंडे, डॉ. चव्हाण मॅडम यांच्यासह आरोग्य कर्मचारी, सर्व डॉक्टर्स व नर्सेस उपस्थित होते. 

श्रीकृष्ण नागरगोजे यांनी घेतली पहिली लस 

केज उपजिल्हा रुग्णालय येथील रक्तपेढी विभागातील रक्त पुरवठा वैज्ञानिक अधिकारी श्रीकृष्ण नागरगोजे यांनी प्रथम लस टोचून घेतली.
No comments