Breaking News

अ‍ॅड. संगिता चव्हाणकडून ऊसतोड मजूरांना ब्लँकेटचे वाटप

ऊसाच्या फडावर महिला आघाडीने राबविला भगवा सप्ताह

बीड : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण’ या धोरणानूसार बीड जिल्ह्यात शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भगवा सप्ताह’ हा उपक्रम सामाजिक उपक्रमाने राबविण्यात येत आहे. यामध्ये बुधवारी दि. 20 जानेवारी रोजी ऊसाच्या फडावर जावून ऊसतोड मजूरांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, अखंड हिंदुस्तानचे कवचकुंडल शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ंठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना मराठवाडा संपर्कनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, मराठावाडा समन्वयक विश्वनाथ जेरूरकर, संपर्कमंत्री संदिपान भुमरे यांच्या सुचनेवरून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, संपर्कप्रमुख आनंद जाधव महिला संपर्क प्रमुख संपदा गडकरी, मा.बदाम पंडीत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीकडून बीड जिल्ह्यात भगवा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. 

गेल्या चार दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच सप्ताहानिमित्त गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील कडाक्याच्या थंडीत काम करनार्‍या ऊसतोड मजुरांना बुधवारी सकाळी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी महिला जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण, उपजिल्हाप्रमुख फरजाना शेख, गेवराई तालुकाप्रमुख लताताई कानगुडे, रेखा वाघमारे, शारदा डुलगुच, लक्ष्मी गुरूकुल, चंदा पवार आदी मुकादम दिलीप राठोड ,ऊसतोड मंजुर ,कडुबाई राठोड, रघुनाथ राठोड, सविता राठोड, मगर जाधव ,शिलपा जाधव ,बापु,राठोड, निशा राठोड, उत्तम राठोड, शांता राठोड, सुदाम चव्हाण, अनिता,चव्हाण, ज्ञान आडे,संजु आडे,वक्र जाधव,शिव कन्या जाधव आदि उपस्थित होते. ऊसतोड मजुरांना कडाक्याच्या थंडीतही काम करावे लागत आहे. त्यांच्या थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने त्यांना ब्लँकेटचे वाटप करत शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.No comments