केजमध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या तीन अंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले
गौतम बचुटे । केज
शहरातील तहसील कार्यालया समोर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनीच चिंचोलीमाळी येथील पारधी समाजाच्या महीलासह नागरीकांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण केले. तर घाटेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत गायकवाड नामक शिक्षकाने आदर्श अंचारसंहीतेचा भंग केला असतानाही त्याच्यावर प्रशासनाने कार्यवाही केली नाही म्हणून प्रशासनाच्या कारभाला वैतागून घाटेवाडी येथील युवकाने ऐन प्रजासत्ताक दिनीच तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असतानाच केज पोलीसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले. तसेच तिसरे आंदोलन हे दिल्ली येथील शेतकरी अंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी केज तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन केज शहरातून भव्य ट्रँक्टर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने पारधी समासाजाच्या लोकांवर अन्याय करत ते राहत असलेली व कसत असलेली गायरान जमीन त्यांच्या ताब्यातून घेतल्याने ते बेघर होते. त्यांनी चिंचोलीमाळीचे सरपंच व ग्रामसेवक यांना विनंती करून आम्हाला राहण्याची सोय म्हणून घरकुल देण्याची मागणी करुनही येथील सत्ताधारी सरपंच यांनी पारधी समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत त्यांना आपमानास्पद वागणूक दिली. म्हणून पारधी समाजातील लोकांनी सरपंच व प्रशासनाच्या नाकर्तेपणाला वैतागून केज तहसील कार्यालया समोर दि.२५ जानेवारी व २६ प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण सुरू केले होते. शेवटी प्रशासनाने या पारधी समाजाला चिंचोलीमाळी येथील ग्रामपंचायतच्या हद्दीत शबरी घरकुल योजने अंतर्गत घरकुल देण्याचे लेखी आश्वासन व गायरान जमिनी विषयी माहिती वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचे लेखी आश्वासन सहाय्यक गटविकास अधिकारी नागरगोजे यांनी दिले. तसेच त्यांच्या इतर मागण्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे पत्र तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी दिल्या नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यात उपोषणार्थी व प्रशासकीय अधिकारी यांना भेटून त्यांच्या मागण्या संदर्भात सुसंवाद घडवून आणण्यासाठी गटनेते हारूणभाई इनामदार, सामाजिक कार्यकर्ते गौतम बचुटे, गंगाधर सिरसट, धनराज सोनवणे यांनी प्रयत्न केले त्यानंतर उपोषणार्थीनी त्यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण सोडले.
केज तालुक्यातील घाटेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत येथील रहीवाशी जिल्हा परीषद शिक्षक गायकवाड यांनी पुढाकार घेऊन ही ग्रामपंचायत आपल्या नातेवाईकांना पुढे करून ही ग्रामपंचायत बिनविरोध काढली. ही बिनविरोध निवड होताच या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात गायकवाड शिक्षक सहभागी होऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून येथील एका युवकाने निवडणूक विभागाकडे तक्रार केली होती.पण संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही केली नाही म्हणून प्रशानाच्या नाकर्तेपणाला वैतागून दि.२६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या युवकाला केज पोलीस स्टेशनचे कर्मचारी मतीन शेख व बाळकृष्ण मुंडे यांनी त्या युवकाला आत्मदहन करण्या पासुन रोखले. तिसरे अंदोलन हे दिल्ली येथील शेतकरी अंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी केज तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन केज शहरातून भव्य ट्रँक्टर रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
No comments