Breaking News

महिला तक्रार निवारण कक्षाच्या दारात तरुणाने घेतलं विष

बीड :  महिला तक्रार निवारण कार्यालयात तारखेसाठी आलेल्या एका 30 वर्षीय तरूणाने कार्यालयाच्या दारातच विषारी औषध पिल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. सदरील तरूणास उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

इम्तियाज कुरेशी (रा.उत्तमनगर गेवराई) याच्या विरोधात त्याच्या पत्नीने महिला तक्रार निवारणामध्ये तक्रार दाखल केली होती. आज पहिली तारीख असल्याने तो आज या कार्यालयात आला होता. आज दुपारी त्याने कार्यालयाच्या दारात विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. विषारी औषध पिण्याचे कारण समजू शकले नाही.

No comments