Breaking News

केजमध्ये गायरान जमिनीसाठी वंचित बहुजनचे आंदोलन

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील भूमिहीन कसत असलेल्या गायरान जमिनी कास्तकऱ्यांच्या नावावर करण्यात याव्यात. लाडेगाव ता केज येथील भूमिहीन यांनी अतिक्रमित गायरान जमिनीवर पेरलेल्या पिकांची शासनाने केलेली नासधूस. याची चौकशी करण्यात या मागणीसाठी केजमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी (दि.२९)  आंदोलन करण्यात आले.


या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील भूमिहीन कसत असलेल्या गायरान जमिनी कास्तकऱ्यांच्या नावावर करण्यात याव्यात. लाडेगाव ता केज येथील भूमिहीन यांनी अतिक्रमित गायरान जमिनीवर पेरलेल्या पिकांची शासनाने केलेली नासधूस. याची चौकशी करण्यात यावी. 

या मागणीसाठी दि. २९ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात प्रचंड घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. त्या नंतर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, धनराज सोनवणे, बाबा मस्के, गौरी शिंदे, अजय भांगे, उत्तम वाघमारे, मधुकर गायकवाड, अभिमान गायकवाड, धिरे यांच्यासह तहसील कार्यालयावर जाऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले. या आंदोलनात लाडेगाव, कौडगाव आणि केज तालुक्यातील अनेक गावातील गायराणधारक मोठ्या प्रमाणावर सामील झाले होते.






No comments