Breaking News

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी पंकजाताई मुंडेंनी समर्पित केला पाच लाखाचा निधी

निधी संकलन अभियान गावा - गावात पोहोचविण्याचे केले आवाहन

माजलगाव :  मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज पाच लाखाचा निधी समर्पित केला. माजलगाव येथे एका कार्यक्रमात निधीचा धनादेश त्यांनी संबंधितांकडे सुपूर्द केला. दरम्यान, राम मंदिर निर्माणासाठी जिल्हयातून रेकॉर्डब्रेक निधी संकलन करावे असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना एका बैठकीत केले.

   श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान जिल्ह्यात गावा- गावात राबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची महत्वपूर्ण बैठक पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगावच्या सिद्धेश्वर संकुलात पार पडली.  परळी, अंबेजोगाई, केज, धारूर, माजलगांव या तालुक्यांचे भाजपचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, जि.प. व पं.स. सदस्य यावेळी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना पंकजाताई म्हणाल्या, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या भव्यदिव्य मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.मंदिर निर्माणाच्या कार्यात प्रत्येकांनी योगदान देण्यासाठी  पुढे यावे, यासाठी निधीचा आकडा महत्वाचा नसून  सर्व स्तरातील लोकांचे योगदान महत्वाचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गावा- गावांत शोभायात्रा काढून निधी संकलन अभियान करावे असे आवाहन त्यांनी केले.

पांच लाखाचा निधी समर्पित

या निधी संकलन अभियानाची सुरुवात स्वतःपासून करताना पंकजाताई मुंडे यांनी पाच लाखाचा निधी राम मंदिरासाठी समर्पित केला.यासंदर्भात एका ट्विटद्वारे माहिती देताना त्यांनी “ प्रभु श्रीराम के अयोध्या में होनेवाले भव्य मंदीर के लिए हमारी भक्ती की एक ईट..पाच लाख की राशी मर्यादापुरुषोत्तम के प्रति श्रद्धा के रूप मे मंदिर निर्माण में समर्पित करती हूं " असे म्हंटले. बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,रमेश आडसकर,अक्षय मुंदडा,मोहन जगताप,रा. स्व. संघाचे विभाग संघचालक डाॅ. पुरुषोत्तम कुलकर्णी,अमरनाथ खुरपे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अन् पंकजाताई मुंडे यांनी ‘गारवा’ रसवंती गृहात घेतला ऊसाच्या रसाचा आस्वाद !

माजलगाव : नेतेपदाचा सर्व बडेजाव बाजूला सारून  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज एका रसवंती गृहात जाऊन ऊसाच्या मधुर रसाचा आस्वाद घेतला, त्यांच्या  अचानक येण्याने रसवंती गृहाचा मालकही क्षणभर थबकला. परंतू नंतर पंकजाताई यांचे मोठया उत्साहात त्यांनी स्वागत केले.

 झाले असे, पंकजाताई मुंडे आज माजलगाव दौर्‍यावर होत्या. सकाळी वैद्यनाथ साखर कारखान्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करून त्या माजलगाव कडे रवाना झाल्या. तेलगांवच्या पुढे अचानक त्यांच्या वाहनाचा ताफा टालेवाडी फाटा येथील 'गारवा' रसवंतीगृहा समोर थांबला. गाडीतून उतरून पंकजाताई थेट रसवंतीगृहात शिरल्या, अचानक  पंकजाताईंना समोर पाहून रसवंतीगृहाचे मालक गणेश बडे  आश्चर्यचकित झाले, त्यांना अतिशय आनंद झाला. मोठया उत्साहात स्वागत करून त्यांनी पंकजाताई यांचेसमोर ऊसाचा ताजा रस काढून दिला, पंकजाताई यांनी देखील त्याचा आस्वाद घेतला. पंकजाताई यांनी यावेळी त्यांची आस्थेवाकपणे चौकशी केली व ऊसाच्या मशिनरीची पाहणी केली. 

नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी या दौऱ्यावेळी ठिकठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार केले. चोपनवाडी, पात्रूड, नित्रूड, भोपा, कासारी बोडखा आदी ठिकाणी त्यांनी सदस्यांचे सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी ग्रामस्थांनी गावच्या समस्याही त्यांचेसमोर मांडल्या.


No comments