Breaking News

माऊली सामाजिक संस्थेच्या दिनदर्शिकेचे गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन


आष्टी :
तालुक्यात माऊली सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, शेती विषयक उपक्रमाबरोबरच संस्थेच्या माध्यमातून नव्याने सुरू केलेल्या भटके विमुक्त, आदिवासी, ऊस तोड मजूर, वीट भट्टी कामगार, भटके विमुक्त, आदिवासी, वंचित व दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या नवजीवन प्रकल्प व स्नेहांकूर केंद्र  यांच्या नावाने दिनदर्शिका तयार करून या दिनदर्शिकेचे प्रकाशन अहमदनगर येथील स्नेहालय या संस्थेचे संस्थापक मा. गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी स्नेहालय संस्थेचे बाळु वारुळे सर,अनिल पठारे सर,पल्लवी ढोरके मॅडम,शिल्पा काकडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विकास म्हस्के यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत पुढील काळात संस्थेच्या वतीने प्रामुख्याने शिक्षण,  बालसंगोपन, अनाथ बालके, महिलांच्या समस्या या गोष्टींवर भर देऊन काम करणार असल्याचे सांगितले. 

   संस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेला आष्टी व जामखेड तालुक्यातील व्यापारी व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहकार्य केले यामध्ये जे. डी. कंस्ट्रक्शन, राज ट्रेडर्स, अथर्व ट्रेडर्स, विकास अँड घाडगे पाटील एजन्सी, विजयश्री कलेक्शन, पार्थ मेडिकल, न्यु शिवशंकर इलेक्ट्रिकल्स, एकलव्य करियर पॉइंट, आष्टी तालुका युवा पत्रकार संघ,विकास कृषी सेवा केंद्र,आराध्या इंटरप्रायझेस,श्री गणेश उडपी,बोडखे ऑफसेट,हॉटेल राजमुद्रा,तन्मय ग्लासेस, आष्टी तालुका पत्रकार संघ,साईराज ऑटो बजाज,गुळाचा चहा,विजयश्री कलेक्शन,श्री स्वामी समर्थ वॉटर प्युरिफायर,आष्टी प्रेस क्लब,इत्यादी. माऊली सामाजिक सेवाभावी संस्थेचे सचिव संतोष गर्जे यांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व सहकार्य करणार्‍यांचे आभार मानले.

No comments