Breaking News

निवृत्ती वेतन धारकांनी आयकर वजातीची माहिती कोषागार कार्यालयाला सादर करण्याचे आवाहन


बीड :  निवृती वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतन धारकांनी त्यांना आयकर लागू होत असेल तर आयकर बाबतचा तपशील दि. 22 जानेवारी पर्यंत बीडच्या कोषागार कार्यालयाकडे सादर केला तरच जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 चे मासिक निवृत्ती वेतन नियमित चालू राहील, असे आवाहन कोषागार कार्यालयाचे कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

ज्या निवृत्ती वेतन धारकांना आयकर कपातीमधून सुट मिळण्यासाठी इतर माध्यमातुन बचत केली असेल अशा बचतीच्या सत्यप्रती, पॅनकार्ड,आधार कार्ड,बँक पासबुक खाते क्रमांकाच्या सत्यप्रती, भ्रमणध्वनी क्रमांक इत्यादी तपशील जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करावा.

संबंधितास नव्या अथवा जुन्या आयकर स्लॅब नुसार जो स्लॅब निवडायचा आहे तसे लेखी कोषागार कार्यालयास अवगत करावे ज्या निवृत्ती वेतन धारकांनी परस्पर आयकर भरणा केलेला असेल, त्यांनी आयकर भरणा केल्यासंबधीचा तपशील, संबधिताचा पॅन क्रमांक या कार्यालयास उपलब्ध न झाल्यास त्याबाबत कोणतीही कार्यवाही कोषागार कार्यालयाकडून केली जाणार नाही. याची जबाबदारी कोषागार कार्यालयाची राहणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी व विहीत वेळेत ही माहिती सादर करुन सहकार्य करावे, अशा सूचना कोषागार अधिकारी यांनी केल्या आहेत.     

         


                                   
                                 


No comments