Breaking News

"चलो बुद्ध धम्म की ओर" कार्यक्रमात बौद्ध महासभा भाळवणी शाखेची कार्यकारिणी गठित!


आष्टी : 
भारतीय बौद्ध महासभा आष्टी तालुका कार्यकारणी च्या वतीने तालुक्यातील  प्रत्येक गावांमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या गाव शाखा निर्माण करण्याच्या हेतूने हाती घेतलेल्या"चलो बुद्ध धम्म  की ओर"  उपक्रमाचा  कार्यक्रम आज दिनांक 24 रोजी      भाळवणी ता. आष्टी या गावात  मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्याहस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करत,त्रिशरण,पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माबद्दल माहिती देऊन लहान बालकावर धम्म संस्कार करावेत  तसेचे  हे कार्य निरंतर चालू राहावेत यासाठी भारतीय बौद्ध महासभाची भाळवणी शाखेची कार्यकारिणी गठित करण्यात आली.

कार्यकारिणीत अध्यक्ष-सोमनाथ निकाळजे, उपाध्यक्ष संस्कार-जगन्नाथ निकाळजे, उपाध्यक्ष संरक्षण- गणेश निकाळजे, उपाध्यक्ष पर्यटन-किसन निकाळजे, उपाध्यक्ष महिला-पल्लवी निकाळजे, सरचिटणीस-पोपट निकाळजे ,सचिव पर्यटन-श्रीकांत निकाळजे, सचिव संस्कार- राहुल निकाळजे,सचिव महिला- स्वाती निकाळजे, हिशोब तपासणी- अविनाश निकाळजे, कार्यालयीण सचिव- रोहन निकाळजे, संघटक- पांडुरंग निकाळजे, गोरख निकाळजे, बन्सी निकाळजे यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाला बीड जिल्हा कोषाध्यक्ष-वामन  निकाळजे जिल्हा उपाध्यक्ष संस्कार-महालिंग निकाळजे, जिल्हा पर्यटन सचिव-सुनील शिंदे आष्टी तालुका अध्यक्ष-सुभाष भादवे, उपाध्यक्ष संरक्षण-रत्नकांत निकाळजे, सरचिटणीस- आकाश कांबळे, शेषराव घुगे, किसन निकाळजे, विलास पवार, गैबी निकाळजे, श्रीरंग पवार, गोरख निकाळजे, दत्तू निकाळजे, रामभाऊ निकाळजे,सोमनाथ निकाळजे, संजय पवार, आसराजी निकाळजे, प्रमोद निकाळजे, अशोक निकाळजे संतोष तुपेरे आदी उपस्थित होते, शेवटी सरनतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.No comments