Breaking News

केजमध्ये भरदिवसा घरफोडी

२ लाख २७ हजार रु. चे सोन्याचे दागिन्यांची चोरी : घटनास्थळी ठसे तज्ज्ञाची भेट

गौतम बचुटे ।  केज 

येथील समता नगर मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दुपारी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून २ लाख २७ हजार रु. चे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब रोड लगतच्या जुन्या सिंचन कार्यालयाच्या कंपाउंड वॉल शेजारी अरुण धारूरकर यांची दोन मजली घर आहे. धारूरकर कुटुंब हे खानावळ चालवित असून दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी घराचा समोरील दरवाजा बंद करून कुलूप लावून खानावळीत गेले होते. त्याची संधी साधून चोरट्यानी दुपारी १:३० वा. च्या दरम्यान घराच्या बाहेरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यातील साड्याखाली ठेवलेल्या चावीने लॉकरचे कुलूप उघडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले. यात २२ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, ३० ग्रॅम वजनाचे पट्टी गंठण, ५ ग्रॅम वजनाचे कानातील वेल, ८ ग्रॅम वजनाचे कानातील झुंबर, ३ ग्रॅम वजनाची गळयातील ठुशी व नगदी १० हजार रु. असे एकुण २ लाख २७ हजार ४५० रु. चोरून नेले. 

या प्रकरणी सविता अरुण धारूरकर यांनी दि.२६ जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० दिलेल्या तक्रारी नुसार गु. र. नं. ४४/२०२१ भा. दं. वि. ४५४, ३८० नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे पुढील तपास करीत आहेत.

करण्यात या चोरीची घटना घडतात बीड येथील ठसे तज्ज्ञाचे पथक केज येथे येऊन त्यांनी संशयित वस्तूवरील चोरट्यांच्या बोटांचे ठसे यांचा तपास लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पथकात ठसे तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस कर्मचारी सानप व शेळके होते.


No comments