Breaking News

परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज मूकनायक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

परळी :  परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक 31 जानेवारी रोजी रविवार सकाळी अकरा वाजता लोकनेते गोपीनाथ मुंडे पत्रकार भवन येथे मूकनायक दिनाचेआयोजन करण्यात आले आहे. 

 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता या विषयावर दैनिक सकाळचे परळी  प्रतिनिधी प्रा. प्रवीण फुटके सर व दुसरे वक्ते मा.लक्ष्मण वैराळ सर यांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी मूकनायक दिनानिमित्त उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन परळी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले. तालुकाध्यक्ष बाबा शेख. कार्याध्यक्ष रानबा गायकवाड यांनी केले आहे.


No comments