Breaking News

आत्ता शहरातून धावणार फिरते एटीएम व्हॅन ; जनतेची होणार गैरसोय दूर..!


मराठवाडा अर्बनचा अभिनव उपक्रम : माजलगावात प्रथमच  आणले फिरते एटीएम 

बाळासाहेब आडागळे । माजलगाव

मराठवाड्यातील पहिले वहिले ‘फिरते एटीएम’ माजलगावात सुरु करण्यात येणार आहे.हा अनोखा उपक्रम शहरातील मराठवाडा अर्बन राबवत असून एटीएमच्या चालत्या फिरत्या व्हेन मुळे ग्राहक जनतेची गैरसोय दूर होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सतीष सावंत यांनी दिली.

शहरात पहिल्यांदाच फिरती एटीएम व्हॅन धावणार आहे.शनिवार दि. 3 रोजी या  व्हॅनचे उद्घाटन होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार,ही ‘मोबाईल ATM व्हॅन’ तालुक्यातल्या प्रत्येक गावात जाऊन बँकेची सेवा देणार आहे.पैसे काढणे,पैसे भरणे,पासबुक प्रिटींग आदी सेवा या व्हॅनमध्ये उपलब्ध असणार आहेत.या दूर अंतरावर राहणाऱ्या तसंच वृद्ध आणि निरक्षर लोकांनाही बँकेच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. ग्रमीण भागात राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी फिरत्या एटीएमचा हा खास उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

या अनोख्या उपक्रमाच्या आगमनामुळे बँकेच्या एटीएम मशीन पुढे रांगेत उभे राहून तांत्रिक अडचणीमुळे काम न झाल्याने उलट पावली परतणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

फिरत्या ATM व्हॅनचे फायदे 

बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,शेतकऱ्यांना मिळणारं, अनुदान तसंच निराधार व्यक्तींचा बँकेत जमा होणारा पगार त्या त्या खातेधारकांपर्यंत पोहचावे यासाठी या फिरत्या एटीएमचा विशेष लाभ होणार असल्याची माहिती  मराठवाडा अर्बनचे चेअरमन सतीष सावंत यांनी दिली आहे.

No comments