Breaking News

बीडच्या वैभवात भर टाकणार्‍या द वूमन वर्ल्डचा उद्या उद्घाटन सोहळा-शिवलता बांगर

अभिनेत्री गायत्री जाधव

अभिनेत्री गायत्री जाधव यांची असणार उपस्थिती

बीड  : बीडमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या द वूमन वर्ल्डचे उद्घाटन प्रसिध्द अभिनेत्री गायत्री जाधव यांच्या हस्ते होणार आहे. हा उद्घाटन सोहळा बीड शहरातील नगर नाका येथील मामा-भाचे कॉम्प्लेक्स येथे आज सोमवार (दि.25) जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन द वूमन वर्ल्डच्या डायरेक्टर शिवलता बांगर यांनी केले आहे.


द वूमन वर्ल्डच्या अकॅडमीत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पत्नी-मुलींना मोफत कोर्स व व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थ सहाय्य केले जाणार आहे. तसेच उसतोड कामगारांचे पाल्य व एकल महीलांना फिसमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या संधीचा महिला व मुलींनी फायदा घ्यावा. नव्याने सुरू होत असलेल्या द वूमन वर्ल्ड अकॅडमीमुळे बीड शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन द वूमन वर्ल्डच्या डायरेक्टर शिवलता बांगर यांच्यासह प्रोफेशनल हेअर स्टायलिस अ‍ॅन्ड ट्रेनर किरण राव यांनी केले आहे.

व्हिडीओ पाहा
No comments