Breaking News

साळेगाव ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार ग्रामसेवक ओम चोपणे यांच्याकडे


सरपंच कैलास जाधव यांनी केले नूतन ग्रामसेवकांचे अभिनंदन

गौतम बचुटे । केज 

साळेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणून अतिरिक्त पदभार असलेले दत्तात्रय गव्हाणे यांच्याकडे काही सदस्यांनी शपथपत्रा आधारे जागेच्या नोंदी घेण्याची अवैद्य व बेकायदेशीर मागणीमुळे गव्हाणे यांनी वरिष्ठ कार्यालयाला विनंती अर्जाद्वारे अतिरिक्त पदभार काढून घेण्याची विनंती केली होती. त्या प्रमाणे गटविकास अधिकारी कार्यालयाने ग्रामसेवक ओम चोपणे यांचा साळेगाव ग्रामपंचायतीचे अतिरिक्त पदभाराचा आदेश काढला आहे.

केज तालुक्यातील साळेगाव येथे ग्रामविकास अधिकारी यांचा सज्जा आहे. परंतु सोईच्या प्रशासकीय अडचणीं कारणांमुळे येथील अतिरिक्त पदभार हा सुर्डी ग्रामपंचायतीचे नियमित ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे यांच्याकडे होता. दत्तात्रय गव्हाणे हे कोकण विभागात सेवा करून बीड जिल्ह्यात बदली होऊन आले होते. ते त्यांच्या शासकीय कामात अत्यंत वक्तशीर आणि नियमानुसार काम करीत होते. परंतु साळेगाव येथे काही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयाद्वारे निवासी घरे व खुल्या जागांची खरेदी-विक्री न करता नोटरी मार्फत शपथ पत्रा आधारे खरेदी खत केलेले आहे. 

त्याची नोंद ग्राम पंचायत मालमत्ता रजिस्टर व अभिलेख्याला घेण्याची मागणी होत होती. परंतु नियमनुसार ते शक्य नसल्याने ग्रामसेवक व लोकप्रतिनिधी यांचा एकमेकांप्रती गैरविश्वास निर्माण झाला. म्हणून गव्हाणे यांनी अतिरिक्त पदभार काढून घेण्याची विनंती अर्जाद्वारे केली होती. त्या नुसार गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी आता साळेगाव ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार हा ओम चोपणे यांच्याकडे सोपविण्याचा आदेश काढला आहे. त्या नुसार दत्तात्रय गव्हाणे यांच्या जागी आता ओम चोपणे पदभार स्विकारणार आहेत. ओम चोपणे देखील एक अत्यंत कर्तव्यदक्ष कर्मचारी असून ते युसुफवडगाव येथील रहिवाशी आहेत. नूतन ग्रामसेवक ओम चोपणे यांच्या आदेशा बद्दल सरपंच कैलास जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ग्रामसेवकांना तळटीपेचा अधिकार ! 

जरी ग्रामपंचायतीने एखादा नियमबाह्य ठराव संमत केला तरी त्यावर कायदेशीर तळ टीप लिहिण्याचा अधिकार ग्रामसेवकास आहे कारण ग्रामसेवक हे कायदेशीर सल्लागार म्हणून सुद्दा काम करतात.


No comments