Breaking News

स्पर्धा परीक्षेच्या मोफत प्रशिक्षणाचा मार्ग झाला मोकळा

राज्यातील बार्टीचे मोफत क्लासेस सुरू करण्याचे ना. धनंजय मुंडेंचे निर्देश

बीड : राज्यात कोरोनामुळे बंद असलेल्या बार्टीचे मोफत स्पर्धा प्रशिक्षणाचे क्लासेस तात्काळ सुरू करण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टी महासंचालक पुणे यांना दिलेत. अशी माहिती सम्राट प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी दिली. 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील कार्यालयात मंत्री ना. धनंजय मुंडे यांना बार्टीचे मोफत स्पर्धा क्लासेस सुरु करण्या संदर्भात राहुल वाघमारे यांनी पत्र दिले होते. पत्रात त्यांनी म्हटले होते की, कोरोनामुळे बंद असलेले व्यवहार आणि शाळा, महाविद्यालये खासगी शिकवणी सुरु झालेली आहे. मात्र बार्टीचे क्लासेस अद्याप सुरु झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्या पत्राची दखल घेत त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टी महासंचालक पुणे यांना दिले आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत दि. 4 मार्च 2020 रोजी राज्यातील वृत्तपत्रांमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरभर्ती पूर्व बँक, एलआयसी रेल्वे, लिपिक वर्गीय तत्सम इत्यादी पदाच्या मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि.22 मार्च 2020 रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून दक्षता म्हणून पुढील आदेशा पर्यंत चाळणी परीक्षेची कार्यवाही स्थगित करण्यात आली होती. परिणामी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे बार्टीचे  मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करून स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा तात्काळ घेऊन अनुसूचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले होते. No comments