Breaking News

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येथील 'आम आदमी'चा ठिय्या सुरूच राहील - डॉ सुभाष माने

इमामपूर रोडच्या रखडलेल्या रस्त्यासाठी आम आदमी पार्टी आक्रमक 

पत्रकार परिषदेत क्षीरसागरांच्या नाकर्तेपणावर डॉ मानेंनी केली कडाडून टीका

आंदोलन स्थळीच घेतली आपने पत्रकार परिषद

बीड :  शहरातील बार्शी नाका नजीक इमामपूर रोडचे जाणीवपूर्वक रखंडवलेल्या कामाला तात्काळ सुरू करा म्हणून सुरू केलेल्या आंदोलनाचा दि 23 जानेवारी रोजी चौथा दिवस असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आम आदमी पार्टीचे विभागीय अध्यक्ष डॉ माने (माजी सहकार सहआयुक्त) यांनी काल आंदोलन स्थळी पोहोचत आपची आक्रमक भूमिका जाहिर केली झाले. नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष क्षीरसागरांच्या व जिल्हाधिकारी, नगरपरिषद प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला असून नगरपरिषदेच्या विरुद्ध रोष निर्माण झालेला असल्याचे ते यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले. 

  जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत बीडमधील 'आम आदमी' हा येथेच ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी आक्रमकपणे जाहीर केले. यावेळी येथील स्थानिक 'आम आदमी' महिलांसह शेकडोच्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेला होता. डॉ माने यांनी सहकार संपवणारे क्षीरसागर आता शहराचीही वाट लावत असल्याचे म्हंटले. शहरात प्रवेश करतानाच कचऱ्याने स्वागत होणारी एकमेव नगरपरिषद बीड आहे. दोन्ही क्षीरसागर एकाच घरात राहून कार्यकर्त्यांना आपसात लढवण्याचे काम करतात. स्वार्थापायी जाणीवपूर्वक रस्ते रखंडवून जनतेला त्रास देतात असाही आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी मराठवाडा संघटन मंत्री मुंडे, जिल्हाध्यक्ष अशोक येडे, बीड संघटन मंत्री ज्ञानेश्वर राऊत, शहरप्रमुख सयद सादेक, सचिव जमाले आदींसह स्थानिक 'आम आदमी' मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होता..

क्षीरसागरांनी सहकारी कारखाना, भूविकास बँक संपवली - माने

सहकारात संपूर्ण राज्याचा कारभार संभाळलेल्या डॉ माने यांनी क्षीरसागरांवर आक्रमक होत बीडमधील सहकार चळवळ संपवल्याचा आरोप केला. सहकारी कारखाना अन भूविकास बँक संपविण्याचे पातक क्षीरसागरांनी केल्याचे ते यावेळी म्हणाले.No comments