Breaking News

वावर प्रकाशन लातूर समुहातर्फे साहित्यिक अनंत कराड यांचा सत्कार

शिरूर कासार : पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही मान्यवरांचा संज्योत पर्यावरण समुहाच्या वतीने रविवार दि.१७ रोजी पाथर्डीतील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती मा.सौ.सुनिता दौंड तर प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक मंडळ महा.राज्य प्राथ.शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष मा.संजय कळमकर, नगराध्यक्ष डॉ.मृत्यूंजय गर्जे, कवयित्री डाॅ.संजीवनी तडेगावकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संज्योत समुह प्रमुख श्रीम.संजीवनी दौंड, बाबा जायभाये यांची उपस्थिती होती.


या पुरस्कारासाठी शिरूर कासार येथील पर्यावरणप्रेमी तथा साहित्यिक अनंत कराड यांची संज्योत पुरस्कार समितीने निवड केली. यापूर्वीही अनंत कराड यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. 'काळ्याई' आणि 'अंदमानचा प्रवास' ही त्यांची दोन बहुचर्चित पुस्तके प्रकाशित आहेत. एकता फाउंडेशनच्या माध्यमातून ते वृक्षरोपण, रक्तदान शिबीरे, साहित्य संमेलनांचे आयोजन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि इतरही सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात सहकार्‍यांच्या मदतीने उल्लेखनीय कार्य करत आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वावर प्रकाशन लातूर, स्वा.सै.गणपतराव बडे सार्वजनिक वाचनालय, तसेच प्रा.डाॅ.भास्कर बडे आणि पैठणस्थित प्रसिद्ध कवी लक्ष्मण खेडकर यांनी त्यांचा सपत्नीक ह्रदय सत्कार केला. तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments