Breaking News

केज पोलिस ठाण्याचा कर्मचारी पॉझिटिव्ह ; संपर्कात आलेले मात्र धास्तावले!


गौतम बचुटे । केज 

केज पोलीस स्टेशनचा एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे केज पोलीस स्टेशन आणि त्याच्या संपर्कात आलेले नागरिक व त्यांचे सहकारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी मागील दोन दिवसापूर्वी कामा निमित्त पुणे येथे जाऊन परत आला होता. परत आल्या नंतर त्याने केज पोलीस स्टेशनला लॉकअप गार्ड म्हणून ड्युटी केली. मात्र त्याला कोरोना रोगाची लक्षणे आढळल्यामुळे तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे केज येथील त्यांच्या संपर्कात आलेले पोलीस कर्मचारी, आणि इतर लोक चांगलेच धास्तावले आहेत. तसेच हा कर्मचारी पोलीस वसाहतीतील अनेकांच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा निष्काळजीपणे वावरणाऱ्या लोकांमुळे नवीन कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे.


No comments