Breaking News

बालविवाहा पासुन मुलीना दूर ठेवणे हीच आजची गरज : अर्चना भाले


म.ज्यो.फुले विद्यालयात माई सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा

माजलगाव :  माई सावित्रीबाई यांनी मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी १८४८ साली प्रतिकुलतेत पाउल उचलले. आजही खुपसा-या मुलीचे बालविवाह होतात. महिला शिक्षण दिन साजरा करताना आपल्या आसपासचे मुलीचे बालविवाह थांबवण्यासाठी पुढे येणे हीच आजची गरज आहे. असे विचार म.ज्यो.फुले माजलगाव येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीउत्सवात बोलताना सौ.अर्चना भाले यांनी व्यक्त केले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मु.अ. श्री प्रदीप भिलेगावकर हे तर सौ.मनिषा पाटील , प्रभाकर साळेगावकर ,व्ही.एन.कुलकर्णी , सुमंत गायकवाड ,संतोष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिमा पूजनानंतर सौ.उर्मिला झांबरे यांनी सावित्रीगीत सादर केले. सर्व शिक्षीकांचा पेनभेट देवुन सन्मान करण्यात आला.

 आपल्या मनोगतात सौ.मनिषा पाटील म्हणाल्या  ,.महिला सक्षमीकरणासाठी आपण शिक्षीका भगिनीनी पुढाकार घेणे महत्वाचे. आपणच आपणास कमकुवत समजु नये. समानतेत पुरूषाची पाठराखण करणं ,आपल्या कार्यात पुरूषांना प्रेरक बनवणे हाच  आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या कडून वसा घेणे व पुढल्या पिढीला देणे.

  यावेळी प्रभाकर साळेगावकर यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले. अध्यक्षीय समारोप करताना प्रदीप  भिलेगावकर म्हणाले..ज्ञान गंगोत्री दारी घेवुन येणा-या वंदनिय माई सावित्रीबाई फुले यांचे कृती युक्त जगणे सदैव प्रेरणादायीच आहे. यावेळी  सर्व शिक्षकवृंद आणि बार्टीचे समतादूत श्री तुकाराम शेवाळे यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन संयोजन, आभार प्रदर्शन प्रविण काळे यांनी मानले.

No comments