Breaking News

आष्टी मतदारसंघात खोटे दावे करून श्रेय लाटण्याचा प्रकार ; आ. बाळासाहेब आजबे यांचा विरोधकांना टोला

के. के. निकाळजे । आष्टी

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व काँग्रेस या महा विकास आघाडीला कौल दिला आहे परंतु काही विरोधक खोटे बोल पण रेटून बोल याप्रमाणे दिशाभूल करणारे आकडे सांगताहेत मतदार संघातील सर्वच ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आल्या असल्याचे दर्शवित आहेत विरोधकांचे हे दावे जनतेची दिशाभूल करणारे असून आष्टी मतदारसंघात विरोधकांना काहीही दिसले की माझेच व मिच केले असे  म्हणायची सवय असल्याची टीका आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विरोधकांवर केली.

आ. बाळासाहेब आजबे हे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले काल आणि आज आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य आपणास भेटण्यासाठी आले होते यातील बहुतांश सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारे आहेत तर काही महाविकास आघाडीतील घटक पक्षाला मानणारे आहेत, त्यामुळे सहाजिकच मतदारसंघात भाजपा पेक्षा महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य जास्त संख्येने निवडून आले आहेत, विरोधक मात्र खोटे बोलत आहेत, त्यांचे आकडे हे जनतेची दिशाभूल करणारे आहेत. खोटे बोल पण रेटून बोलअसे विरोधक बोलत आहेत ,शहरी व ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टी बाबत जनतेमध्ये नकारात्मक भूमिका तयार झाली आहे त्यामुळे मतदारसंघातील जनताही महाविकास आघाडीच्या बाजूने उभी आहे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुतांश ग्रामपंचायततिचे  नवनिर्वाचित सदस्य आपणाकडे आले असता आपण सर्वांचे फेटा बांधून सत्कार केले आहेत, त्यामुळे विरोधकांनी कितीही खोटे दावे केले तरी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीतराष्ट्रवादी, शिवसेना, व काँग्रेस या महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला असल्याचे ही शेवटी आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
No comments