Breaking News

परळी पत्रकार संघाच्या वतीने साजरा होणार दर्पण दिन


महत्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा; आवर्जून उपस्थित राहण्याचे पदाधिकाऱ्यांचे आवाहन

 

परळी :  शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा साथी पीसीएन न्युज कार्यालयात सकाळी ११ वाजता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष संभाजी मुंडे, तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, कार्याध्यक्ष धिरज जंगले यांनी केले आहे.

दरवर्षी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन 06 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात येतो. याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने कार्यक्रम होणार आहे. मराठवाडा साथी पीसीएन न्युज कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात पत्रकार संघाच्या आगामी धोरण व कार्याबद्दल तसेच अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार असून, शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष संभाजी मुंडे, तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, कार्याध्यक्ष धिरज जंगले यांनी केले आहे.

No comments