Breaking News

लोक निर्माण ग्रामीण व संशोधन चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर


रेखा बागुल , वैशाली पाटील, स्वाती धोटकर, विनोद डिसोझा , नवनाथ येवले आदींसह देशभरातील  विविध  कोरोना योध्यांचा समावेश 

शिरूर कासार : लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्थे च्या वतीने दिले जाणारे यंदाचे राष्ट्रीय गौरव पुरस्कार सौ. रेखा बागुल , वैशाली पाटील , स्वाती धोटकर, विनोद डिसोझा , नवनाथ येवले आदींसह  देशभरातील  विविध  कोरोना योध्यांना जाहीर करण्यात आले आहेत. राज्यमंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि ३  औरंगाबाद येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून उपस्थित राहण्याचे अवाहन संस्थेच्या अध्यक्षा कु.अर्चना मेडेवार यांनी केले आहे. 


देशभरात सामाजिक क्षेत्रामध्ये मोलाचे कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींच्या लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने दरवर्षी  राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.  सामाजिक, सांकृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्यांची दखल घेऊन त्यांच्या गौरवाची परंपरा संस्था गेल्यां २२ वर्षापासून जोपासत आहे. संस्थेच्या अध्यक्षा कु. अर्चना मेडेवार यांच्या‌ संकल्पनेतून राज्यासह देशभरातील वंचित, शोषीत, दुर्लक्षीत समाज घटकांसह गरीब, गरजुंना मानवतेचा आधार दिला आहे. निराधार , निरश्रतींना मायेची उस देणार्या लोक निर्माण ग्रामीण व संशोधन संस्थेचे कोरोना कालावधीतील सेवाभाव मोलाचा ठरवा आहे. दरम्यान, २०२०-२१ या वर्षात देशासह जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले. 


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून  फ्रंट लाईन वरील  देशभरातील कोरोना वॅरियर्स अंगणवाडी कार्यकर्ती , शिक्षक, अशा वर्कर, एएनएम , जेएनएम, डॉक्टर्स यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार , पोलीस प्रशासनातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जबाबदारी सांभाळली आहे. संस्थेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचे राष्ट्रीय गौरव पुरस्कार सौ. रेखा बागुल , वैशाली पाटील , स्वाती धोटकर, विनोद डिसोझा पत्रकार मुबई , नवनाथ येवले पत्रकार बीड ,मनीष शर्मा दिल्ली, महेंद्र खोकर राज्यस्थान, सोनाली बावसर गुजरात, नेहा राणी पाटणा (बिहार), एम बाबुराव हैद्राबाद (तेलंगणा),गीता पांडे हर्डा (मध्य प्रदेश),प्रीती  (भोपाळ),डॉ. नम्रता आनंद पाटणा (बिहार ), ऍड . मंजुषा गौतम कटनी (बिहार), संजयकुमार बबलू समस्तीपूर (बिहार ), मीरा तुपारे पुणे , रेखा मानते , थुम्बा ठाकरे, सौ . रेखा बाबुल पालघर , लक्ष्मण  लखपती परभणी, लक्ष्मण तुकाराम मदन जालना , अशा वैद्य हिंगोली, डॉ . योगिनी औरंगाबाद ,स्वाती कोटकर  आदींसह देशभरातील विविध राज्याच्या १५१ कर्तबगार व्यक्तींना जाहीर झाल्याची  घोषणा संस्थेच्या अध्यक्षा कु. अर्चना मेडेवार यांनी केली.  राज्यमंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी दि. ३ औरंगाबाद येथील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अर्चना मेडेवार यांनी केले आहे. 


No comments