Breaking News

आम आदमी पक्षाकडून ऐतिहासिक कारंजा टॉवरची साफसफाई

सत्ताधारी शिवसेनेने शहराचे विद्रुपीकरण थांबवावे अन्यथा पुढील रविवारी नगरपरिषद कार्यालयात सफाई अभियान राबवले जाणार - येडे, सय्यद, राऊत

बीड :  आम आदमी पार्टीच्या वतीने बीड शहरामध्ये सलग 5 व्या रविवारी स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आली. बीड शहरांमधील मध्यभागी असणाऱ्या कारंजा टॉवरची साफसफाई करून बीड नगरपरिषदेच्या अस्वच्छ कारभाराची चिरफाड आप'ने केली आहे. 

 

                 
 स्वच्छतेच्या नावाखाली जागोजागी  'स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ शहर सुंदर शहर'असे फलक घेऊन जागोजागी नाचत असलेली     , त्यांचे हे दिंडोरा पिटण्याचं नाटक जनतेसमोर ठेवण्याचे काम आम आदमी पक्ष करत आहे. सौंदर्यकरणाच्या नावावरती जनतेचे लाखो रुपये खर्च करून अस्वछता तर आहेच शिवाय आज त्या इमारतीच्या समोर फक्त आणि फक्त सत्ताधाऱ्यांचे लावलेले असलेले होल्डिंग दिसताहेत. जर याप्रकारे शहराचा इतिहास झाकण्याचे काम होत असेल तर आपण त्या शहराचं भविष्य देखील बनवू शकत नाही म्हणून हा जनतेचा पैशाची लूट होत असणारी नगरपरिषद आणि त्याचा भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत, येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी अशाच प्रकारे जनतेसमोर मोठे प्रश्न मांडण्याचा काम करणार आहे. 

  शहराचे विद्रुपीकरण, अस्वछता थांबवली नाही तर आम आदमी पक्ष पुढच्या रविवारी नगरपरिषदेच्या कार्यालयातच स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे आपने स्पष्ट केले आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणे नागरिक व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये माजी सैनिक अशोक जिल्हाध्यक्ष, प्राध्यापक राऊत संघटनमंत्री, शहराध्यक्ष साधी सय्यद, संदीप घाडगे, आमटे जी, योगेश पोळ, स्वप्निल गायकवाड, अभिषेक टाळके आणि इतर मोठ्या प्रमाणे कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments