Breaking News

ढाकणवाडी शिवारात २२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग

गौतम बचुटे  । केज  

केज तालुक्यतील ढाकणवाडी शिवारात एका २२ वर्षीय विवाहितेचा पती शेतात गेल्याची संधी साधून तिच्या जवळच्या नातेवाईकाने वाईट हेतूने तिचा पदर ओढून विनयभंग केल्याची घटना घडली आहे.


अधिक माहिती अशी की, रामेश्वर वाडी येथील एक कुटुंब हे ढाकणवाडी शिवारात रहात आहे. दि. २३ जानेवारी रोजी  सकाळी ९:४५ वा. च्या दरम्यान एका २२ वर्षीय विवाहितेचा पती शेतात कामासाठी गेला होता. ती विवाहित महिला घरात काम करीत असताना तिच्या एका नातेवाईकाने संधी साधून वाईट हेतूने तिचा पदर धरून ओढला. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली व विनयभंग केला. त्या नंतर ती ओरडली असता तिचा पती सोडविण्यासाठी आला. त्याला पण आरोपी व त्याचा नातेवाईक यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीत विवाहितेच्या फिर्यादी वरून तिचा नातेवाईक आणि सख्खा सासरा यांच्या विरुद्ध केज पोलीस स्टेशनला गु. र. नं. ३६/२०२१ भा. दं. वि. ३५४, ३५४ (अ), ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक सोनवणे हे करीत आहेत.No comments