Breaking News

केजमध्ये ब्राम्हण समाजचे पळी-ताम्हण बजाव आंदोलन


गौतम बचुटे । केज

येथील तहसील कार्यालया समोर ब्राम्हण समाज संघर्ष समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यासाठी पळी-ताम्हण बजाव आंदोलन करण्यात आले.

या बाबतची माहिती अशी की, ब्राम्हण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे.  समाजातील तरुणांना शैक्षणिक, व्यवसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन महामंडळाला १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी . ) प्रत्येक जिल्ह्यात मुला - मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापन करण्यात यावे. के जी टु पी जी शिक्षण मोफत करण्यात यावे. समाजावर केल्या जाणाऱ्या बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरुध्द ॲट्रॉसिटी कायद्या सारखा तत्सम कायदा करुन कारवाई करण्यात यावी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. पुरोहित समाजाला मासिक ५००० रु. मानधन सुरु करण्यात यावे. कुळात गेलेल्या जमीनी परत देण्यात याव्यात. या मागण्यांसाठी केज तहसील कार्यालया समोर पळी- ताम्हण वाजवून धरणे आंदोलनात करण्यात आहे. धनंजय कुलकर्णी, श्रीनिवास केजकर , श्रीधर खोत , श्रीराम शेटे, अनंत कोकीळ, विश्वास शेटे, विजय क्षीरसागर, सुनिल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, प्रदिप कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, पी. एस. लहुरीकर, व्यकंट पांडव, अतुल कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, उध्दव रामदासी, राहुल कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, अतुल मुथळे, अभिजीत शेटे, अभय कुलकर्णी, गुणवंत जोशी आदी समाजबांधव सहभागी झाले होते.

समाजाच्या वतीने मांडण्यात येणार आहेत .समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. त्यासाठी वेळोवेळी लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने विविध प्रकारचे आदोलने करुन शासन दरबारी समाजाने आपले मगणे मांडले आहे. 

सन२०१८ साली केज ते बीड मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. त्या नंतर २२ जानेवारी २०१९ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर महाधरणे आदोलन करण्यात आले होते. परंतु त्यानंतर कसलाही विचार झालेला नाही. म्हणून प्रलंबित मागण्यां राज्यात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी आयुक्त कार्यालय या ठिकाणी घंटानाद आंदोलन, महाधरणे आंदोलन करुन शासनाला प्रलंबित मागण्याचे निवेदन सादर करण्यात येत आहे. 

परंतु याकडे शासन आणि प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले . यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन एक प्रकारचा न्युनगंड निर्माण झाला आहे . या माफक व न्याय प्रलंबित मागण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने ऑक्टोबर - नोव्हेंबर 2020 या महिन्यात राज्यातील सर्व आजी - माजी मंत्री , खाण्यार , आमदार या लोकप्रतिनिधींना प्रलंबित मागण्याचे स्मरणपत्र येवुन जागो सरकार , जागो अभियान राबविण्यात आले . हिवाळी अधिवेशनात या मागण्या संदर्भात काहीतरी ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा समाजाला असताना या अधिवेशनातही समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासन आणि प्रशासनाकडून झाल्याने समाजात असंतोष पसरला असुन 1 जानेवारी 2021 ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत राज्यभरात शासन आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी ताम्हण - पळी बजाय आदोलन करुन आपल्या प्रलंबित मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात व समाजाला न्याय मिजयुन देण्यासाठी संपूर्ण राज्यभरात सुरु करण्यात आले आहे . 22 जानेवारी 2021 रोजी औरंगाबाद येथे काटी चौकात या आंदोलनाचा समारोप होणार असुन 22 जानेवारी 2021 पर्वत शासन आणि प्रशासनाने बाहाण समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात ठोस पाऊले न उपल्यास या पुढील आदोलन अधिक ती स्वरूपात समाजाच्या वतीने करण्यात येईल. 

यासाठी मा . मुख्यमंत्री जयबजी अकरे , बानी समाजाच्या मागण्यांचा सहानुभूतीपुर्पक विचार कराया व मागण्या माना कराव्यात ही समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आपणास विनंती . समाजाचे आर्थिक सक्षण करण्यात यावे . 22 समाजातील तरुणांना शैक्षणिक , व्यवसायिक तसेच सणांना वैद्यकीय मदत मित्राच्यासाठी स्वतंत्र आणिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळारा 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी . 3 ) प्रत्येक जिल्लामा मुला - मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापन करण्यात यावे . 4 ) केजी दुपीजी शिक्षण मोफत करण्यात यावे . 5 ) आहाण समाजावर केल्या जाणा - या बदनामीकारक पक्रया करणाया मातीविरुष्य अट्रोसिटी अक्टनुसार अथवा तत्सम कायदा करून कारवाई करण्यात यावी . 6 ) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरल पुरस्काराने सन्मानित करण्यात 7 ) पुरोहित समाजाला मासिक 5,000 रुपये मानधन गुरु करण्यात याये , 8 ) ब्राह्मण समाजाच्या कुळात गेलेल्या जमीनी परत देण्यात याव्यात . यासह आदी मागण्या धरणे आंदोलनात समाजाच्या वतीने मांडण्यात येणार आहेत .

धनंजय कुलकर्णी , श्रीनिवास केजकर , श्रीधर खोत , श्रीराम शेटे , अनंत कोकीळ , विश्वास शेटे , विजय क्षीरसागर , सुनिल कुलकर्णी , ऋषिकेश जोशी , प्रदिप कुलकर्णी , अतुल कुलकर्णी , पी एस लहुरीकर , व्यकंट पांडव , अतुल कुलकर्णी , दत्तात्रय कुलकर्णी , उध्दव रामदासी , राहुल कुलकर्णी अंबाजोगाई , चंद्रकांत पाटील , अतुल मुथळे , अभिजीत शेटे , अभय कुलकर्णी , गुणवंत जोशी यांच्यासह ब्राम्हण समाज बांधव सहभागी झाले होते. 


No comments