Breaking News

आज मुख्यमंत्र्यासमेवत होणारी बैठक मराठा समाजाला न्याय देणारी आ. मेटे


मराठा समाजातील
निवड होवून नोकरी न मिळालेल्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न 
बैठकीतून सोडविण्याचा प्रयत्न

बीड : एसईबीसी ईडब्ल्युएस मधुन ज्या मराठा समाजातील मुलांची निवड होवून त्यांना नोकर्‍या मिळालेल्या नाहीत, तो प्रश्न आजच्या बैठकीतून सोडविण्याचा प्रयत्न राहील. शिवाय येत्या 25 तारखेला मराठा आरक्षणावर होणारी सुनावणी बद्दल रणनितीवर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे आज दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक मराठा समाजाला न्याय देणारी ठरेल, अशी अपेक्षा आ.विनायकराव मेटे यांनी बैठकीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.
मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मराठा समजातील विविध संघटना आणि त्यांच्या नेत्यांची बैठक व्हावी अशी भूमिका शिवसंग्रामने मांडली होती. त्यानुसार आज दुपारी मुख्यंमंत्री ठाकरे यांच्यासमेवत मराठा समाजातील विविध संघटनांच्या नेत्यांसह आ.विनायकराव मेटे यांची बैठक होत आहे. येत्या 25 तारखेला मा.सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर होणार्‍या सुनावणी बद्दल आगामी रणनितीबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच  एसईबीसी ईडब्ल्युएस मधुन ज्या मराठा समाजातील मुलांची निवड होवून त्यांना नोकरीवर घेण्यात आले नाही. त्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न या बैठकीच्या माध्यमातून सोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे आ. मेटे यांनी सांगून आजची बैठक लक्षकेंद्रीत करणारी असून मराठा समाजाला न्याय देणारी ठरेल, अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.   
No comments