Breaking News

अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी

 


बीड : सोलापूर महापालिकेचे उपमहापौर श्री. राजेश काळे यांनी सदर महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त तसेच अन्य अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावल्याची व त्यांचेकडे खंडणी मागितल्याची रितसर तक्रार सोलापूर महापालिकेचे उपायुक्त श्री. धनराज पांडे यांनी सोलापूर सदर बाजार पोलिस  ठाण्यात दाखल केली आहे.

          राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, आरोपींना अटक करून त्यांचेविरुध्द नियमानुसार कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित पालिका अधिकाऱ्यांना तात्काळ पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी अधिकारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

         बीड जिल्हाधिकारी कार्यालयाचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देताना बीड जिल्हा राजपत्रित अधिकारी महासंघाचे श्री.पी.जी.जावळे, सतिश देशपांडे, दि.र.झिरपे, शिवप्रसाद जटाळे, सतिश घोळवे, विकास ढोले आदी उपस्थित होते.

No comments