तक्रार देऊनही तलाठ्यांनी केला जाणीवपूर्वक फेरफार मंजूर; पाडळी येथील शेतकऱ्याचे तहसील समोर उपोषण!
प्रजासत्ताकदिनापासून सुरु असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!
शिरूर कासार : तालुक्यातील पाडळी गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना तक्रार देऊनही तलाठ्याने फेरफार मंजूर केल्याप्रकरणी येथील शेतकरी समाधान बापूराव इंगळे यांनी शिरूर तहसील कार्यालयासमोर प्रशासनाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी दोन दिवसापासून उपोषणाला बसले आहेत तरीही प्रशासनाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
तालुक्यातील पाडळी येथील गट नंबर 333/334 मधील खरेदीखत दस्त क्रमांक 1587/1588 या खरेदीखताचा फेरमंजूर करू नये म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी तलाठी यांना व मंडळाधिकारी यांना प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन तक्रारी अर्ज दिला होता तरी संबंधित अधिकारी यांनी संगनमत करून खरेदी घेणार यांच्याकडून पैशाची लाच घेऊन दि.५/१/२०२१ रोजी फेरफार क्र 2942 /2021 व फेरफार क्रमांक 2943 /2021 हे फेर महसुली अभिलेख सातबारा नोंद घेतलेली आहेत.
वस्तुस्थिती पाहता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तक्रारी बाबत विचार केलेला नाही व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनंती करून देखील संबंधितांनी महसूल अधिनियमाच्या उल्लंघन करून कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता वरिष्ठ मार्गदर्शन न घेता पैसे घेऊन फेरफार तलाठ्यांनीमंजूर केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी दिले आहे त्या अनुषंगाने हा फेरफार मंजूर करावा व आम्हाला न्याय मिळावा यासाठी आणि अन्यायग्रस्त शेतकरी प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत दोन दिवसापासून शेतकरी समाधान बाबुराव इंगळे हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत अनधिकृत झालेल्या फेरफार तात्काळ रद्द करावा व मला न्याय द्यावा या मागणीसाठी शेतकरी दोन दिवसांपासून उपोषण करत असून प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने यांच्यावर मोठा अन्याय होत असल्याची जाणीव शेतकरी व्यक्त करत आहेत.
No comments