Breaking News

शिरुर शहराबाहेर कुक्कुट पक्षी न हलविल्यास होणार कारवाई

प्रतिकात्मक

बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नगरपंचायत झाली सज्ज ; मुख्याधिकारी किशोर सानप यांचा पक्षीपालकांना इशारा

शिरुर, का. : बर्ड फ्लूचा शिरकाव शिरुर कासारमध्ये होऊ नये. यासाठी शहरातील कुक्कुट पक्षी शहराबाहेर हलविण्यात यावेत. अन्यथा कुक्कुट पक्षी चालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिरुर का. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी दिला आहे.

शिरूर कासार शहराच्या जवळ असलेल्या  पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी तसेच पाटोदा तालुक्यातील मुगावमध्ये आढळून आल्याचे अनेक वृत्तपत्रे, दूरचित्र वाहिन्या,  सोशल मीडियातून वृत्त प्रकाशित झाले आहेत.  त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तसेच मिडसांगवी तालुका पाथर्डी येथील शिरूर कासार शहराचा संपर्क लक्षात घेता शिरूर कासार शहरातील कुक्कुट पक्षामुळे मानवी संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता शहरातील लोकवस्ती मधील कुक्कुट पक्षी शहराबाहेर हलवणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील कुक्कुट पक्षी लोकवस्ती बाहेर तात्काळ हलविण्यात यावे अन्यथा कुक्कुट पक्षी चालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिरूर कासार नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. सानप यांनी दिला आहे.
No comments