Breaking News

केकतसारणीत जुगार अड्डयावर पोलिसांची धाड

मुद्देमलासह साडेसात लाख रुपयांचे साहित्य ताब्यात

गौतम बचुटे ।  केज 

तालुक्यातील केकतसारणी शिवारात विशेष पोलीस अधीक्षक राजास्वामी यांच्या विशेष शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकून कारवाई केली. यात पोलीस पथकाने एकूण ७ लाख ५० हजार ७० रुपयांचे साहित्य जप्त करून वीस जुगार खेळणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली.


या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील केकत सारणी शिवारातील रामधन करांडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये झन्ना-मना नावाचा जुगार चालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या नुसार जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजास्वामी यांच्या विशेष पथकाने दि.२८ जानेवारी रोजी दुपारी अचानक धाड घातली. धाडीत रोख रक्कम व साहित्य असे मिळून ऐकूण ७ लाख ५० हजार ७० रु चा मुद्देमाल जप्त केला. दि. २९ जानेवारी रोजी २० जणां विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या तक्रारी वरून युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला मुंबई जुगार कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांदे हे करीत आहेत.


No comments