Breaking News

हाळमच्या शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी ना.धनंजय मुंडे यांना निवेदन


हाळम ते मोहटंब (उजनी) रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचे ना. धनंजय मुंडे यांचे आदेश 

परळी : हाळम ते मोहटंब (उजनी) रस्ता व्हावा यासाठी तालुक्यातील हाळम येथील शेतकरी २०१३ साला पासून प्रशासन दरबारी मागणी करत होते. परंतु प्रशासनाकडून कसलीही दखल घेतली जात नव्हती.

 मात्र रविवार दि.दहा रोजी थर्मल पावर चेमरी रेस्ट हाऊस येथे हाळम येथील शेतकऱ्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री बीड ना.धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी रस्त्या अभावीच्या अडचणी कथन केल्या व २०१३ पासून वारंवार रस्त्याची मागणी करूनही प्रशासनाकडून कसलीही दखल घेतली जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी ना.मुंडे यांच्याकडे करताच ना.धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकारी,नायब तहसीलदार यांना सदरील रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या.त्यामुळे हाळम येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ना.धनंजय मुंडे यांना निवेदन देतेवेळी युवा नेते माधव मुंडे, शेतकरी सर्वश्री प्रभाकर नामदेव गुट्टे,लहू नामदेव गुट्टे,मंचक वैजनाथ गुट्टे,बालाजी नामदेव गुट्टे,बामाजी माणिकराव गुट्टे,परमेश्वर मधुकर गुट्टे,सोनाजी श्रीहरी गुट्टे,जगन्नाथ नामदेव गुट्टे,भागवत रंगनाथ गुट्टे यांच्यासह अनेक शेतकरी निवेदन  देते वेळी उपस्थित होते.

No comments