Breaking News

आणीबाणीतील मिसांदीना सहा महिन्याचे थकीत पेन्शन द्या


उच्च न्यायालयाचा आदेश; महाविकास आघाडीला चपराक

निर्णयाचे स्वागत-विश्वास पांडे, जगन्नाथ शहाणे

औरंगाबाद : 1975 ते 77 या काळात देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्या मिसाबंदीना थकित सहा महिन्याचे पेन्शन 10 फेब्रुवारीपर्यंत देण्यात यावेत असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या सन्माननिय न्यायमुर्तीने दिले आहेत. या निर्णयाने महाविकास आघाडी सरकारला चपराक बसली आहे तर या निर्णयाचे स्वागत अ.भा.लोकतंत्र सेनानी संयुक्त संघर्ष समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख ह.भ.प.विश्वास महाराज पांडे तर बीड जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शहाणे यांनी केले आहे.

देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना आणीबाणीत तुरूंगवास भोगलेल्या मिसाबंदीला 10,000 रू. पेन्शन सुरू केली पण कोरोनाच्या काळात ठाकरे सरकारने आर्थिक टंचाईचे कारण सांगत हे पेन्शन बंद केले आहे. या संदर्भात लोकतंत्र स्वातंत्र्य सेनानी संघाचे अध्यक्ष रघुनाथ दिक्षीत व अनंत आचार्य यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. तिचा निकाल नुकताच लागला आहे. त्यात 10 फेब्रुवारी पर्यंत 6 महिन्याचे पेन्शन देण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर नियमित पगार देण्यात यावा असे म्हटले आहे. उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती एस.व्ही.गंगापुरवाला व श्रीकांत कुलकर्णी यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली आहे. या महत्वपूर्ण निर्णयाचे विश्वास महाराज पांडे व जगन्नाथ शहाणे यांनी स्वागत केले आहे.

No comments