Breaking News

मुप्टा न्युजच्या वतीने मूकनायक दिन सोहळ्याचे आयोजन

बीड : भारतीय समाजाच्या उन्नत प्रगतीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी कार्य केले. त्या त्या महापुरुषांची विचारधारा समाजात रुजविण्याचे कार्य प्रामुख्याने मुप्टाच्या वतीने केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दबलेल्या आवाजाला बोलके करुन त्यांना वाचा देण्याचे कार्य 31 जानेवारी 1920 साली मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करुन केले. त्या घटनेस 101 वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने बीड जिल्हा मुप्टा व मुप्टा न्युजच्या वतीने मूकनायक दिन सोहळा सोमवार दिनांक 01 फेब्रुवारी 2021 रोजी तुलसी इंग्लिश स्कुल,बीड येथे सांय.06.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

    महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर असोशियशन (मुप्टा) ही संघटना शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी व वेगवेगळ्या कारणांनी अन्यायग्रस्त शिक्षक बंधु भगिनींना न्याय मिळवून देणारी सक्षम संघटना आहे. समर्थशाली शौक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य ही संघटनेच्या माध्यमातून केले जाते. त्या सर्व कार्याचा आढावा समाजापर्यंत पोहचविण्यासाठी मुप्टा न्युज या प्रसारमाध्यमाची सुरुवात करण्यात आलेली आहे.

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा. प्रदिप रोडे (मुख्य संपादक, मुप्टा न्युज,बीड), व्याख्याते डॉ.सचिन अभिमन्यु बनसोडे,औरंगाबाद, मा. प्रविण गायकवाड ( अधिक्षक - वेतन देयक व भ.नि.नि. पथक कार्यालय,बीड), मा. पी.व्ही.बनसोडे (निवृत्त अतिरिक्त सी.इ.ओ.), मा.विजय बहादुरे (उपसंपादक, पुण्यनगरी,औरंगाबाद), मा. इंजि.भिमज्ञ वेडे ( निवृत्त उपविभागीय अधिकारी जलसंपदा विभाग) आदिंसह उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाकरिता बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुप्टा न्युज च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments