Breaking News

क्रांतीसुर्य संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन


माजलगांव :  क्रांतीसुर्य सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सपोनि निता गायकवाड   यांचे हस्ते रविवारी (दि.३) रोजी दु.४ वा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन,केसापुरी वसाहत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संजय बागुल हे होते तर य‍ावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन के.व्ही. साळवे,लिलाताई उजगरे, अशोक मगर,अाल्का उजगरे,भारत  टाकणखार,अभिमन्यू इबिते व इतर उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणुन निता गायकवाड (स.पो.नि.माजलगांव शहर) म्हणाल्या कि, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या कार्यामुळे मी अधिकारी होऊ शकले. माझ्यासारख्या अशा अनेक महिला आहेत. त्यांनी उच्चपदे भुषविले आहेत.तसेच संस्थेच्या विविध उपक्रमाचे कौतुक करुन पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

       तर प्रा.बागुल यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले य‍ांचे जयंतीनिमित्त या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतिने या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाल्याचे जाहिर केले.ते पुढे म्हणाले की,फुले दांपत्याचा आदर्श आज समाजातिल सर्व घटकांनी घेण्याची गरज आहे.या संस्थेच्या कार्य निश्चीतच प्रेरणादायी आहे.या संस्थेच्या वतिने अखंडित अॉनलाईन ३५ व्याख्यानाचे आयोजन  केले आहे.त्यामुळे या संस्थेचे पुढील कालावधीमध्ये चांगले कार्य असेल.यासाठी आपण सर्वांनी होईल ती मदत करावी.

  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिनेश निसर्गंध यांनी केले.तर पाहुण्यांचे आभार बळिराम माने यांनी मानले.या कार्यक्रमास संस्थेचे शत्रुघ्न कसबे, अश्विन टाकणखार, स्वप्निल स्वामी,प्रवीण वाव्हळ,सदानंद भैया प्रधान,केतन प्रधान, सचिन मगर,आदिनाथ लोखंडे,अभिजित साळवे, राहुल धाईजे,कपिल भाग्यवंत,राहुल वाघमारे, प्रदीप शिंदे,बाळू गायसमुद्रे,रविकिरण टाकणखार,सिद्धार्थ साळवे व इतरांनी परिश्रम घेतले.

No comments