Breaking News

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यामध्ये ‘शिवसेना महिला आघाडीचा भगवा सप्ताह’


स्व.बाळासाहेब ठाकरेंची सामाजिक उपक्रमाने होणार जयंती साजरी

बीड : शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, अखंड हिंदुस्तानचे कवचकुंडल शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बीड जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने 17 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान भगवा सप्ताह साजरी करण्याचे आयोजन महिला शिवसेना जिल्हा प्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी केले असून जिल्ह्यात आठवडाभरा विविध सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी करणार असल्याचे सांगितले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अनेक समाजपयेगी कार्यक्रमांचे आयोजन पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ंठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना मराठवाडा संपर्कनेते माजी खासदार चंद्रकांतजी खैरे, मराठावाडा समन्वयक विश्वनाथजी नेरूररकर, संपर्कमंत्री संदिपानजी भुमरे यांच्या सुचनेवरून माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, संपर्कप्रमुख आनंदजी जाधव महिला संपर्क प्रमुख संपदाताई गडकरी, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. संगिताताई चव्हाण यांच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दि.17 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत भगावा सप्ताह साजरा करण्यात येणार असून यामध्ये रविवार दि. 17 जानेवारी रोजी शहरापासून जवळच असलेल्या इंन्फंड इंडीया येथील एचआयव्हीग्रस्त मुलांना शैक्षणिक साहित्य वापट करून कार्यक्रमाला सुरूवात करणार असून प्रत्येक दिवशी विविध सामाजिक उपक्रम केले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक घराघरामध्ये स्व. बाळासाहेबांचे विचार पोहचविण्याचे कार्य शिवसेना महिला आघाडी करत जिल्ह्यात जास्तीत जास्त महिला सदस्य नोंदणी करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संगिताताई चव्हाण यांनी सांगितले आहे.


No comments