Breaking News

नेहरूनगर बुंदेलपुरा भागातील सिमेंट रस्ते, नाल्या व अमृत पेयजल पाईप जोडणी हे कामे त्वरित चालू करा- अनिल घुमरे


          

बीड : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या नेहरूनगर बुंदेलपुरा भागात गेल्या अनेक वर्षापासून नागरी सुविधांचा अभाव असून या भागातील संपूर्ण रस्ते उखडलेले आहेत. जागोजागी खड्डे झालेले आहेत या खड्ड्यामध्ये नियमितपणे नालेसफाई होत नसल्याने नाल्यांचे पाणी  जमा होते तसेच रस्त्यावर पाण्याचे डबके तयार होत आहे त्यामुळे या परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची व पादचारी नागरिकांची गैरसोय होत आहे.
पाण्याच्या पाईप लाईन मध्ये लिकेज असल्याने साचलेले दुर्गंधीयुक्त दूषित पाणी येथील रहिवाशांच्या घराघरात पोहोचते पर्यायाने येथील जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे या व अशा अनेक समस्यांना नेहरूनगर परिसरातील रहिवाशांना सद्यस्थितीत सामोरे जावे लागत आहे.या सर्व बाबींकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.अशा प्रकारचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री गुट्टे साहेब यांना शिवसंग्राम चे नेते श्री अनिल घुमरे शेषराव तांबे यांच्यासह या भागातील रहिवासी सर्वश्री सुधीर जोगदंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. गुट्टे साहेब,ॲड.बळीराम कदम , सालपे सर शिवाजी कडेकर रमेश त्रिभूने बंकट फुलझळके मिलिंद भोले वारकरी साहेब भागवत साहेब, बेग साहेब, गफार देशमुख, संतराम शिंदे, शेवाळे, धोंडगे पाटील, कणसे साहेब खरात साहेब, वैजनाथ फुलझळके यांनी समक्ष भेटून निवेदन देऊन चर्चा केली यावरील समस्यांचे निराकरण लवकरात लवकर न झाल्यास शिवसंग्रामतर्फे तिव्र आंदोलन   करण्यात येईल असा इशारा शिवसंग्रामचेअनिल घुमरे यांनी दिला.   

No comments