Breaking News

पत्की भगिणींचे संगीत परिक्षेत यश


परळी वैजनाथ :   येथील नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी आर्या अनिल पत्की आणि  कौमुदी अनिल पत्की यांनी प्रयाग संगीत समिती अलाहाबाद अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.   

 

       येथील नाद ब्रम्ह विद्यालयाच्या विद्यार्थिनी आर्या पत्की व कौमुदी पत्की यांनी नुकत्याच झालेल्या परिक्षेत आर्या पत्की हिने सीनियर डिप्लोमा परीक्षेत तर कौमुदी पत्की ने प्रवेशिका परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल नादब्रह्म संगीत विद्यालयाचे संचालक वीरेंद्र उर्फ (दीपक) नरवणे यांनी आर्या व कौमुदी चे अभिनंदन केले आहे.  लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख यांच्या या दोघी नाती आहेत .कु. आर्या  व कु. कौमुदी पत्की यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.No comments