Breaking News

सरकारमधील मंत्र्यांमध्ये नोकर भरती करण्याची स्पर्धा, हेच मराठा समाजावरील मोठं संकट : आ.विनायकराव मेटे

अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगावातील मराठा समाजाच्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनास आ. मेटेंचा पाठींबा ; साष्टपिंपळगावातील ठिणगी राज्यभरात वणवा पेटवणार ..! 

अंबड  : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात निर्णय झालेला नसताना राज्य सरकार मधील मंत्र्यांमध्ये मात्र नोकर भरती करण्याची स्पर्धा लागली आहे. अशी खोच टीका आ. विनायकराव मेटे यांनी करत हेच मराठा समाजावरील संकट असल्याचं सांगत मराठा समाजातील तरुण, वडीलधारी मंडळी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगावात उपोषण करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. या गावातून आंदोलनाची सुरवात झाली असली तरी राज्यभरात याचा वणवा पेटल्या शिवाय राहणार नाही. असही ते म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा समाजातील तरुणांसह वडीलधारी मंडळी गेल्या दहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन करतायत. शनिवारी (दि.३०) या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आ. विनायकराव मेटे यांनी आंदोलनस्थळी जावून आंदोलकांची भेट घेतली. याप्रसंगी आंदोलकाशी संवाद साधतांना ते बोलत होते. 

यावेळी आ. मेटे म्हणाले की, मराठा समाजातील मुलांच्या भविष्यासाठी या आंदोलनात तरुणांसह वडीलधारी मंडळी सहभागी झाल्याने त्यांनी त्यांचे कौतुक केले. मराठा समाजाच्या प्रश्नवर राज्य सरकार गंभीर नसून निर्दय झालेलं हे सरकार असून आपण हे पाहत असल्याचं आ. मेटे यांनी सांगत मराठा समाज हा लढव्या समाज आहे, त्याला जे पाहिजे तो मिळवून घेतो. हा इतिहास आहे. मात्र लोकशाहीत लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हे बरोबर आहे. परंतु गेल्या दहा दिवसांपासून अन्न- पाण्या विना समाज बांधव उपोषण करतायेत. परंतु निर्दय सरकार जाग होत नाही. हे पाहून दुःख होत आहे. लढाई जिंकण्यासाठी आपण सशक्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे माझी उपोषणकर्त्या समाज बांधवांना विनंती आहे, की त्यांनी उपोषण न करता आंदोलन सुरू ठेवावे. असे आवाहन आ. मेटे यांनी उपोषणकृत्यांना करून  साष्टपिंपळगावातील आंदोलनचा वणवा राज्यभर पेटल्या शिवाय राहणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे. येत्या 5 फेब्रुवारीला त्यावर सुनावणी होणार आहे. आरक्षणाचा निकाल आपल्या बाजूने कसा लागेल, यासाठी चांगल्यात चांगले वकील असले पाहिजेत. साक्षी- पुरावे व्यवस्थीपणे मांडले पाहिजेत. आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करू. मात्र, सध्या ऐरणीवर असलेला नोकर भरतीचा प्रश्न आहे.  मराठा समाजातील मुलांना डावलून नोकर भरतीच डाव आखला जात आहे. एमपीएससीच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत. नुसत्या परीक्षा जाहीर करून थांबले नाहीत तर एमपीएससीचे अध्यक्ष सतिष गवई दररोज एक नवी घोषणा करतायत व  मराठा समाजाच्या व खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात दररोज एक नवीन परिपत्रक काढतायत. त्यात अनेक त्रुटी आहेत. सन 2014, 2018, 2019 मध्ये एमपीएससीच्या परीक्षा झाल्या. त्यात जी मुले पास झालीत, त्यांना नियुक्ती देण्याचं सोडून नवीन परीक्षा घेण्याचे धोरण आखले जात आहे. हे अतिषय चुकीची व दुर्देवाची बाब आहे. 

राज्य सरकार मधील अनेक मंत्र्यामध्ये नोकर भरती करण्याची स्पर्धा लागली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 9500 जागांवर भरती काढली, आपल्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागात 17500 पदांची भारती काढली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भरती केली असून अजून ते 29 ते 30 हजार पदांसाठी पुन्हा भरती काढत आहेत. एवढच काय तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड याही मागे नाहीत. त्याही शिक्षण विभागात पद भरती काढण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मराठा समाजातील मुलांचे नुकसान होणार आहे. हेच मोठं संकट आहे.  मेडिकल, इंजिनियर व इतर विभागाचे प्रवेश आघाडी सरकारने स्थगिती आल्यानंतर व EWS देण्याच्या अगोदर पूर्ण केले. यामुळे हजारो मुले-मुली डॉक्टर - इंजिनियर होण्यापासून वंचित  राहिलेत. त्यामुळे  विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त झालं आहे. हे पाप या महाविकास आघाडी सरकारने केले आहे, असे आ. मेटे म्हणाले. 

सरकारने साष्टपिंपळगाव येथील आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी - आ.विनायकराव मेटे

मराठा संघटनांचे नेतृत्व अनेक असले तरी उद्देश, मागणी, धोरण व कार्यक्रम एक आहेत. मराठा समाजाच्या प्रश्न मार्गी लागावेत. यासाठी (जालना, ता. अंबड) येथील साष्टपिंपळगावमध्ये समाज बांधव गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करतायत. मात्र सरकारचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून आ. मेटे यांनी आंदोलन चालु ठेवावे. मात्र, उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच राज्य सरकारने या आंदोलनाची गंभीरपणे दखल घ्यावी, अन्यथा राज्यभर याचा वणवा पेटल्या शिवाय राहणार नाही, असेही आ. मेटे म्हणाले.  

 निर्दय सरकारला जाग करण्यासाठी.... 

मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांप्रती  निर्दय झालेल्या सरकराला जाग करण्यासाठी येत्या ७ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी एल्गार मेळाव्याची सुरुवात जालना जिल्हयातून  करण्यात येईल. तसेच नागपुर, मुंबई, बारामतीसह राज्यभरात ठीक- ठिकाणी राज्यव्यापी एल्गार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. या एल्गार मेळाव्यात मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन आ. विनायकराव मेटे यांनी केले.


 

No comments