Breaking News

साडे चार महिन्यांनंतर सचिन कागदेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

परळी  : फुले आंबेडकर अभ्यासक या सामाजिक संघघटनेचे तथा पत्रकार इंजि. भगवान साकसमुद्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सचिन कागदे यांच्यासह अन्य सहा जणांविरुद्ध संभाजी नगर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल असून याप्रकरणात साडे चार महिन्यांनंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  

फुले आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी १४४ दिवसांनंतर संभाजीनगर पोलीस स्टेशन २५८/२०२० भा.दं.वि. ३०७,३४१,५०४,५०६,१४३,१४७,१४४,१४९,१८८, आर्म्स ऍक्ट ४, कोविड विनियम ११, व्यवस्थापन ५१ (ब) आदी कलमान्वये सचिन कागदे सह सहा जणांवर परळी न्यायालयात ११८ पानी आरोपपत्र दि.२८ डिसेंबर २०२० रोजी दाखल केले. या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन कागदे दि.६ ऑगस्ट पासून ९९ दिवस फरार होता. या आरोपपत्रात घटनास्थळीचे सी.सी.टीव्ही. फुटेजसह महत्वाचे १६४ च्या जबाबासह इतरही साक्षी पुराव्यांचा समावेश आहे.

No comments