Breaking News

केज तालुक्यात शेतकऱ्याला खांबाला बांधून विष पाजले : १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


गौतम बचुटे । केज  

तालुक्यातील युसूफ वडगाव येथे शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याला विजेच्या खांबाला बांधून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने विषारी द्रव्य पाजण्यात आले. या प्रकारामुळे केज तालुक्यात खळबळ माजली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ६:३० वा. च्या दरम्यान विलास पानढवळे हा त्याच्या सर्व्हे नं. ७१ मध्ये पीव्हीसी पाईप जमा करीत असताना बालासाहेब मारुती पानढवळे, वैभव पानढवळे, विकास पानढवळे, बालासाहेब दत्तुबा, निवृत्ती शिंपले, बाबा दतु शिंपले, आश्रुबा दत्तुबा शिंपले, महादेव धोंडीबा शिंपले, अनुसया बालासाहेब पानढवळे, गिता वैभव पानढवळे, स्वाती विकास पानढवळे व अन्य दोन अशा एकुण १३ जणांनी त्यास लाठ्या-काठ्यांनी, दगड व पादत्राणे यांनी मारहाण केली. नंतर विलास पानढवळे याच्या पायाला धरून फरफटत ओढत नेऊन विजेच्या खांबाला दोरीने बांधून डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्या नंतर त्याचा खून करण्याच्या उद्देशाने त्याला विषारी द्रव्य पाजले. विलास पानढवळे यांच्या फिर्यादी नुसार युसूफवडगाव पोलीस स्टेशनला बालासाहेब पानढवळे, वैभव पानढवळे, विकास पानढवळे, बालासाहेब दत्तुबा, निवृत्ती शिंपले, बाबा शिंपले, आश्रुबा शिंपले, महादेव शिंपले, अनुसया पानढवळे, गिता पानढवळे, स्वाती पानढवळे व अन्य दोन अशा एकुण १३ जणां विरुद्ध गु. र. नं. ०३/२०२१ भा. दं. वि. ३०७, १४३, १४७, १४८ १४९ नुसार खून करण्याचा प्रयत्न करणे व दंगल माजविणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत आणि युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सीमा कोळी या पुढील तपास करीत आहेत. अद्याप या प्रकरणी आरोपीना अटक करण्यात आली नसून लवकरच आरोपीना अटक करून कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती तपासी अधिकारी पोउनि सीमा कोळी यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली.

No comments