Breaking News

केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याची योजना नाही : प्रकाश आंबेडकर


कोरेगाव भीमा : अर्थव्यवस्था बदलण्यासाठी सरकारकडे कोणताही योजना नाही, सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. आज सकाळी त्यांनी कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एक जानेवारी हा या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे असं आम्ही मानतो. पेशवाईच्या काळात जी अस्पृश्यता पाळली जात होती त्या विरोधातील हा लढा होता. हा लढा यशस्वी झाला. तेव्हापासून सुरू झालेली ही सोशल मुव्हमेंट खऱ्या अर्थाने जोपर्यंत लोकशाही येत नाही, तोपर्यंत कायम राहील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी सुधारायची याचा प्लॅन नाही. लोक ठरवतायत काय करायचं ते. सरकार स्वतः काहीही करत नाही. मुंबई लोकल आतापर्यंत सुरू व्हायला हवी होती. दोन्ही सरकारकडे निर्णयक्षमता नाही, असंही ते म्हणाले.

No comments