Breaking News

चोरीच्या प्रकरणात सापडल्या 42 दुचाकी : कागदपत्र व ओळख पटवून दुचाकी घेवून जाण्याचं ; परळी पोलिसांचे आवाहन


परळी : परळी शहर पोलीस प्रशासनाने विविध प्रकारच्या कार्यवाहीत तसेच अपघातात आणि चोरीच्या प्रकरणात सापडलेल्या 42 बेवारस मोटारसाकली आहेत. त्या मोटारसायकलीच्या मुळ मालकांनी कागदपत्र व वाहनांची ओळख दाखवून घेवून जाण्याचे आवाहन परळी शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.हेंमत कदम यांनी केले आहे. 

                   या बाबत पोलीस सुत्राकडून प्राप्त माहिती अशी की, परळी शहर पोलीस ठाणे हद्दीत 42 मोटारसाकल मिळून आल्या असुन मुळ मालकाचे नाव पत्ता मिळून येत नसल्याने सदर मोटारसाकलच्या मुळ मालकांचा शोध घेणे त्यामुळे ज्याची मोटारसाकयल अपघातात, विविध कार्यवाहीत , चोरी प्रकरणात मिळून आल्या आहेत. अशा 42 मोटारसायकली ज्याच्या असतील त्यानी मुळ कागदपत्राची चिसी क्रमांक, इंजिन क्रमांक, आदी ओळख दाखवून मोटारसायकल घेवून जाण्याचे आवाहन परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी केले आहे.


No comments