Breaking News

घाटसावळी एसबीआयमधील 3 महिन्यांपासून रखडलेली पीककर्जे मंजुरीस सुरुवात


जिल्हाधिकारी रेखावार साहेब व एसबीआय शाखा व्यवस्थापक केदार यांचे आभार - धनंजय गुंदेकर

बीड :  घाटसावळी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 230 ते 250 शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रकरणे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनही प्रलंबित होते. याबाबत शेतकऱ्यांनी बँकेला कारणे विचारले असता सदरील शेतकऱ्यांचे कर्ज खाते न खोलल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अद्याप कर्ज मंजूर होऊनही कर्ज रक्कम प्राप्त होऊ शकली नसल्याचे सांगितले. 


     सामाजिक कार्यकर्ते धनंजय गुंदेकर, दत्ता जाधव यांनी पुढाकार घेऊन याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदनाद्वारे सदर शेतकऱ्यांना पिककर्जासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून कालपासून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना पीककर्ज मंजुरीचे संदेश मिळत आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून शेतकऱ्यांना या रखडलेल्या पिककर्जामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. पीककर्ज मंजुरीसाठी प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार साहेब, घाटसावळी शाखेचे व्यवस्थापक श्री केदार, बँकमित्र सुनील लांडे यांचे धनंजय गुंदेकर व शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

No comments