Breaking News

केजमध्ये घरफोडी : सोन्याच्या दागिन्यांसह 25 हजाराची रोकड केली लंपास


गौतम बचुटे । केज  

घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह २५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना केज शहरातील वकीलवाडीत घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

या बाबतची माहिती अशी की, केज येथील वकिलवाडी भागातील शाहूनगर येथील अंधारे यांच्या घराचे अज्ञात चोरट्यानी कुलूप तोडुन घरात प्रवेश  केला आणि घरातील सोन्याचे गंठन व पेडल असे ४० हजार रु. किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार रु. असे एकूण ६५ हजार रु. ची चोरी केली आहे. काजल मयूर अंधारे यांनी दि. ३१ डिसेंबर रोजी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.नं. ५६०/२०२० भा.दं.वि. ४५७ व ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे करीत आहेत.

No comments