Breaking News

शिरूर नगरपंचायतीचा स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सहभाग : शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापरणाऱ्या दुकानदारांवर नगरपंचायतीची कारवाई


28. 500 किलो वजनाच्या प्लास्टीक पिशव्या केल्या जप्त

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर होणार दंडात्मक कारवाई :  मुख्याधिकारी किशोर सानप यांचा इशारा

शिरूर कासार :  स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्त शहर व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिरूर कासार शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील दुकानदारांची झडाझडती घेतली. त्यावेळी विविध दुकानांमधून एकूण 28. 500 किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा, मुख्याधिकारी किशोर सानप यांनी दिला.


प्लास्टिक पिशव्यांचा वापर शिरुर शहरात सर्रास केला केला जातोय. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होवून परिणाम मानवी जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. शिवाय प्लास्टिक पिशव्या इतरत्र कोठेही टाकल्या जात असल्याने मुकी जनावरे ही त्याला खात असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासनाने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान राबविण्यास सुरवात केली. यंदाच्या 2021 या अभियानात अंतर्गत प्लास्टिक मुक्त शहर व माझी वसुंधरा अभियानामध्ये शिरुर कासार नगरपंचायतने सहभाग घेतला आहे.

शिरूर कासार प्लास्टिक मुक्त करण्यासाठी येथील नगरपंचायतीने गुरुवारी या अभियानाला शहरात सुरुवात केली आहे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या शहरातील दुकानदारांची झाडाझडती घेतली. त्यावेळी विविध दुकानदारांकडून 28.500 वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.


ही कारवाई नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप, स्थापत्य अभियंता राहुल देशमुख, लिपिक नामदेव घुगे, जगदिष तगर, अक्षय सुरवसे, शेख कौसर, शहादेव गायकवाड, शरद गवळी, प्राणकुल दगडे, हनुमान कानडे यांनी केली. तसेच यापुढे प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः बंद करून कापडी पिशव्यांचा वापर करावा. दुकानातील कचरा इतरत्र न टाकता नगरपंचायतीच्या घंटागाडी कचरा टाकण्यात यावा. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व दुकानाच्या परिसरात कचरा आढळून आल्यास संबंधित दुकानदारावर पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

नागरिकांनीही खरेदीसाठी येताना कापडी पिशव्यांचा वापर करावा व आपल्या घरातील ओला व सुका कचरा हे घंटागाडीचा टाकावा. तसेच शिरूर शहरात कोठेही नगरपंचायतीच्या परवानगीशिवाय बॅनर, बोर्ड, फ्लेक्स लावण्यात येऊ नये, अन्यथा विनापरवानगी बॅनर, बोर्ड फ्लेक्स  लावण्यात आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शिरूर कासार शहर स्वच्छ सर्वेक्षण 2021 या अभियानात सहभागी झाले आहे. त्यामुळे शहराला जास्तीत जास्त सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.

No comments