Breaking News

अल्पसंख्यांक प्र. क्र. 19 20 आणि 21 चे रस्त्यांचे चौकशी करून कामे सुरू करा - सय्यद इलयास


बीड  : प्र क्र. २०-२१ मधील बार्शी नाका चौक ते आंबेडकर चौक पर्यंतच्या सिमेंट रस्त्याची चौकशी करणे व मिलन फंक्शन हॉल ते मिल्लत नगर-दिलावर नगर मार्गे तेलगाव नाका ते नाळवंडी नाका जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापर्यंत या प्र. क्र. १९-२० आणि 21 ची चौकशी करुन रस्ता तयार करून घेण्यात यावे, अशी मागणी ए आय एम आय एमचे युवानेते सय्यद इलयास यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक 20, 21 मधील बार्शी नाका चौक ते आंबेडकर चौक पर्यंत जाणारा मुख्य रस्ता काही दिवसांपूर्वी सिमेंट काँक्रेट मध्ये बनविण्याचे कार्य सुरू आहे. यात काही ठिकाणी रस्ता बनविला आहे तर काही ठिकाणी अजूनही सोडून देण्यात आलेला आहे. परंतु जेवढा रस्ता बनवला आहे त्यामध्ये लोखंडी सळ्यांचा वापर न करता नुसते खडी, रेती, भुकटा व सिमेंट चे मिश्रण करून रस्ता बनवत आहे. लोखंडी सळ्या विना बनविलेला हा रस्ता लवकरच खराब होईल यात शंका नाही. तरी याविषयी आपण आपल्या स्तरावर चौकशी करून ज्या अभियंता व गुत्तेदारांच्या हस्ते या रस्त्याचे कार्य होत आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. 

हा रस्ता पुन्हा लोखंडी सळ्या टाकुन बनविला जावा. तसेच याच रस्त्यावर असलेल्या मिलन फंक्शन हॉल ते मिल्लत नगर दिलावर नगर मार्गे तेलगाव नाका ते नाळवंडी नाका पर्यंत प्रभाग क्रमांक 19, 20 मधील सर्व रस्ते लवकरात लवकर सिमेंट काँक्रीट चे तयार करण्यात यावे. कारण या प्रभागांमध्ये अटल अमृत जल योजना तसेच भुयारी गटार योजनेचे सुरू करण्यात आलेले काम जवळपास आटपत आले आहे. यामुळे आता या प्रभागांमधील सर्व रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. येथील रस्ते खांदून ठेवल्याने या प्रभागातील नागरिकांना रहदारीसाठी प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. वेळप्रसंगी दुचाकीस्वार मोटर सायकल वरुन पडत आहेत. जखमी होत आहेत. म्हणून जनतेला होणारा त्रास दूर करण्याकरिता जिल्हाधिकारी या नात्याने आपण शहरातील या प्रभाग क्रमांक 19,20, 21 मध्ये जातीने लक्ष घालून संबंधित अभियंता व गुत्तेदाराला योग्य ते निर्देश देऊन लवकरात लवकर रस्त्यांचे व नाल्यांचे कार्य करून द्यावे. अशी मागणी एम आय एम चे युवा नेते सय्यद इलयास, मोमिन जावेद भाई, सलीम भाई कुरेशी, इजहार कुरेशी, शेख आजम मोमिना आवेज, कुरेशी बिलाल, शेख फारुख, फिरोज मणियार, आवेज मणियार, जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनात द्वारे मांडण्यात आले.

No comments