Breaking News

आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती, उद्या निघणार जाहिरात

मुंबई : आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार असून यासंदर्भात उद्या जाहिरात निघणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे. असं त्यांनी सांगितलं. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची जाहिरात उद्या निघणार आहे. यामध्ये जीएनएम, नर्सेस, टेक्निशियन, वॉर्डबॉय अशी वेगवेगळी पद असतील. क आणि ड वर्गाच्या पदांची ही भरती असेल. 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा होईल आणि त्यानंतर दोन तीन दिवसात निकाल लागेल.







No comments